Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण कंपनीच्या तारांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । विद्यूत महावितरण कंपनीच्या मालकीचे २५ हजार रूपये किंमतीचे अल्यूमिनीअमचे तारांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, विद्यूत महाविरण कपंनीचे इलेक्ट्रिक सामान व वस्तू ठेवण्यासाठी ममुराबाद शिवारात एक जागा भाड्याने घेतले आहे. त्याठिकाणी महावितरण कंपनीचे डी.पी., स्विच, अल्यूमिनीअमचे तार आणि बिनतारी वायर यासह अनेक वस्तू ठेवल्या जातात. २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तारांची चोरी केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कनिष्ठ अभियंता कल्पेश गोपाळ सपके रा. लक्ष्मी नगर जळगाव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे. 

Exit mobile version