महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी; ७० हजाराचा मुद्देमाल लांबविला

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील राजोरा शिवारातील महावितरण कंपनीच्या ७० हजार रूपये किंमतीच्या तारांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल तालुक्यातील राजोरा शिवारातील यावल -भुसावळ रस्त्यावर असलेल्या राजोरा फाट्याजवळील सुनिता ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतील ईलक्ट्रिक डीपीवळून खंबा क्रमांक ३ ते ११ पर्यंतच्या ईलेक्टिक तारांची चोरी केल्याचे माहिती शेतकरी मधुकर नारखेडे यांनी महावितरण राजोरा कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ हर्षल पोपट मोरे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी रविवार ५ जून रोजी पाहणी केली. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे २ हजार १६० मिटर तारांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत वरिष्ठ तंत्रज्ञ हर्षल मोरे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content