महावितरण कंपनीच्या डी.पी.च्या ऑईलची चोरी

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी सेक्टरमधील आकाश पॉलीमर्स कंपनीसमोर आलेल्या ईलेक्ट्रिक डीपीतून १२ हजार रूपये किंमतीचे ४०० लिटर ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी एन-सेक्टरच्या परिसरात ३० मे रोजी दुपारी २ वाजता विज प्रवाह खंडीत झाला होता. वीज प्रवाह सुरू ठेवण्यासाठी विद्यूत महावितरण कंपनीचे कर्मचारी खंडीत झालेल्या भाग शोध काम सुरू होते. दरम्यान, एमआयडीसीतील एन-१२१ जवळील आकाश पॉलीमर्स कंपनीसमोर असलेल्या इलेक्ट्रीक डीपीपासून विजपुरवठा खंडीत झालेला होता. या डिपीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १२ हजार रूपये किंमतीचे ४०० लीटर ऑईल चोरून नेल्याचे उघडकीला आले. महावितरण कर्मचारी जितेंद्र दत्तूसींग भोळे यांच्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कान्स्टेबर विजय पाटील करीत आहे.

Protected Content