Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणी मार्केटमधून दुचाकीची चोरी; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अर्जून वासूदेव जाधव (वय-२१) रा. रेणूका नगर मेहरूण जळगाव हे ८ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने शहरातील गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एमएच १९ डीएच ३३६१) ने दुपारी ४ वाजता आले. त्यांनी दुचाकी दत्तमंदीराच्या पुढे पार्किंग करून गेले. दरम्यान रात्री ९ वाजता दुचाकी जवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली आहे. परिसरातही शोधाशोध केली दुचाकी न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अर्जून जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

Exit mobile version