Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसीतील गोडावूनमधून साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेड क्रॉस सोसायटीचे मशनिरी साहित्यासाठी लागणारे साहित्य एमआयडीसीतील गोडावूनचे कुलूप तोडून लांबविल्याची घटना उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी सुमारे ७५ हजारांचे साहित्य लांबवले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील इंद्रप्रस्थ नगरात लक्ष्मण जानकीराम तिवारी हे वृद्ध वास्तव्यास असून ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे. सोसायटीमध्ये मशनिरी साहित्यामध्ये रेफ्रि जरेटर, ब्लड बँकेचे डिफ्रिजर, लहान मोठे फ्रिज, ईलाईजा रीडर, सेल काऊंटर असे विविध साहित्य रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन विनोद बियाणी यांच्या एमआयडीसीतील एम सेक्टर १७ मध्ये असलेल्या कंपनीत ठेवलेले होते. त्यांनी ही जागा गेल्या पाच वर्षांपासून भाडेतत्वावर घेतली आहे. दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ते दि. १ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान त्यांनी हे साहित्य ठेवलेले होते. रेडक्रॉस मदर ब्लड सेंटर अंतर्गत जिल्ह्यातील काही तालुक्यातील ब्लड स्टोरेज सेंटर सुरु करायचे असल्यामुळे या मशनिरीमध्ये लागणारे साहित्य घेवून ती दि. ७ जानेवारी रोजी दुरुस्त केली होती.

प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी यांनी १७ ऑक्टोंबर रोजी जावून पाहणी केली असता, त्यांना सामान व्यवस्थीत ठेवलेले दिसले. त्यानंतर दि. २७ रोजी सायंकाळी त्यांना विनोद बियाणी यांचा फोन आला. त्यांनी गोडावूनच्या कंपाऊंटचे व शटरचे कुलूप तुटलले असल्याचे सांगितले. त्यानुसार तिवारी यांनी जावून पाहणी केली असता, त्यांना गोडावूनमध्ये ठेवलेल्या साहित्याची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.

Exit mobile version