Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामदेववाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरमधून मुद्देमालाची चोरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी ट्रक साठी लागणार टायर ट्यूब व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीच्या कंटेनर (MH-१९, CY-२२८१ ) मध्ये पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीचा सुमारे ३ लाख ३६ हजार माल भरून गुहाटीकडे रवाना झाला. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता कंटनेर घेवून जळगाव कडे येत असतांना तालुक्यातील रामदेववाडी येथील रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला. सलमान खान सलीम खान पठाण हे अंधार असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबून तिथेच झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून मध्ये ठेवलेला ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले. सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईनचे मॅनेजर रामदास साहेबराव खैरनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात न्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.

 

Exit mobile version