Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे लोखंडी अँगल व प्लेटांची चोरी; पोलीसांत गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रूपये किंमतीचे लोंखडी अँगल व प्लेटा चोरून नेले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मोकळ्या जागेवर लोखंडी ॲगल आणि लोखंडी प्लेट व इतर बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. हा सामान ७ मार्च ते १७ दरम्यात तिथेच पडून होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीचे लोखंडी प्लेटा आणि लोंखडी अँगल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुभम किशोरराव चिमोटे (वय-२६) रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ भुसावळ यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २२ मार्च रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Exit mobile version