Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घर फोडून सामांनाची चोरी; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेंदालाल मिल येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून गॅस सिलेंडर, पाण्याची मोटार, पितळी हंडे असा सामान चोरून नेल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक रविंद्र गायकवाड (वय-३५) रा. उधना सुरते (गुजरात) हा तरूणाचे घर गेंदालाल मिल येथे आहे. कामानिमित्त तो सुरत येथे वास्तव्याला असल्याने त्याची आई मंदा गायकवाड यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लावून मुलगा दिपक गायकवाड यांच्याकडे गेले होते. दरम्यान त्यांचे बंद घरात चोरी झाल्याचे त्यांच्या शेजारी राहणारे आरीफ शहा यांनी फोनद्वारे कळविले. त्यानुसार दिपक गायकवाड हे रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता जळगावात आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून  गॅस सिलेंडर, पाण्याची मोटार, पितळी हंडे यासह इतर सामांनाची चोरी केली. हा प्रकार घडल्यानंत दिपक गायकवाड यांनी सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version