Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रूद्रम टोलनाक्याच्या कॅबिनमधून इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा शिवार येथील रुद्रम टोलनाक्याच्या कॅबिनमधून ५० हजार ५०० रूपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिकेत रोहिदास भिरूड  (वय-३०) रा. किरंगेवाडा फैजपूर ता. यावल यांचे यावल तालुक्यातील आमोदा शिवारातील शेत गट क्रमांक १४१ मध्ये रुद्रम तोलकाट्या नावाचे ट्रेडिंग कंपनी आहे. शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता अनिकेत भिरूड हे काम आटोपून येथील कॅबिन बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या केबिन मधील इलेक्ट्रिक साहित्य वजन काटा, प्रिंटर, कीबोर्ड असा एकूण पन्नास हजार रुपये पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी ९ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी अनिकेत भिरुड यांनी फैजपूर पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रविवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोकुळ तायडे करीत आहे.

Exit mobile version