Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ शिवारातील शेत गट नंबर ४५ मधील महावितरण कंपनीच्या मालकीच्या ४५ हजार रूपये किंमतीच्या विद्यूत तारांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ शिवारातील शेत गट नंबर ४५ येथे महावितरण कंपनीच्या मालकीचे विद्यूत खांब लावण्यात आले आहे. या सोमवारी १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० ते मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीच्या ४५ हजार रूपये किंमतीच्या विद्यूत तारा चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी वाल्मिक युवराज पाटील वय २८ रा. लोंजे ता. चाळीसगाव यांनी धाव घेवून माहिती घेतली. त्यानंत त्यांनी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पाोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप माने हे करीत आहे.

Exit mobile version