Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा न्यायालय परिसरात राहणाऱ्या एकाची ईलेक्ट्रीक मोटारीसह साहित्याची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागे असलेल्या हौसिंग सोसायटी येथून पाण्याची इलेक्ट्रिक मोटर व नळी असा एकूण ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग विनायक सोनवणे वय-४२, रा. जिल्हा न्यायालयाच्या मागे, हाउसिंग सोसायटी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे . दरम्यान शनिवार १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या घरातून इलेक्ट्रिक मोटर आणि पाण्याची नळी असा एकूण ५ हजार रुपये किमतीचा मुद्देपाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर पांडुरंग सोनवणे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवार १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.

Exit mobile version