Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतातून इलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टेंभी गावठाण शिवारातून ट्यूबवेलची केबल वायरसह इतर वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास शंकर सूर्यवंशी (वय-५८) रा. शिवाजीनगर यावल यांचे शेती आणि दूध व्यवसाय आहे. त्यांचे तालुक्यातील टेंभी गावठाण शिवारात शेत गट नंबर २५०८ मध्ये ट्यूबवेल केलेले आहे. या टुबवेलजवळ देवीदास सुर्यवंशी यांनी थ्री फेज वायर केबल आणि कॉपर कण्डक्टर ठेवलेले होते. १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ६ हजार रुपये किमतीची केबल आणि व कंडक्टर चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीला आला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर देविदास सूर्यवंशी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.

 

Exit mobile version