मेहुणबारे शिवारातून गायी व वासरूंची चोरी; अज्ञातांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे शिवारातून ३६ हजार रूपये किंमतीचे तीन गायी आणि तीन वासरू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील मेहुणबारे शिवारातील तिरपोळे रोडवर दिपक दगा गढरी (वय-४५) रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या ३६ हजार रूपये किंमतीच्या तीन गायी आणि तीन वासरू बांधलेले होते. ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ७ सप्टेंबर रोजीसकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन गायी आणि तीन वासरू चोरून नेले. दिपक गढरी यांनी परिसरातील शेतात गायींचा शोध घेतला परंतू आढळून आले नाही. याप्रकरणी दिपक गढरी यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ अरूण पाटील करीत आहे.

 

Protected Content