Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी शिवारात कापसाची चोरी; सात जणांवर गुन्हा दाखल

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) । जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारातून सात जणांनी १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रमेश दामू सुशिर (वय-६९) रा. पाळधी ता. जामनेर जि.जळगाव यांचे पाळधी शिवारात शेत आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील भावलाल दामु सुशिर (वय-७१), परमेश्वर भावलाल सुशिर (वय-२७), ज्ञानेश्वर भावला सुशिर (वय-३२), दिलीप माधव सुशिर (वय-४५), संजय माधव सुशिर (वय-४३), राजेश माधव सुशिर (वय-४१) आणि बेबाबाई दिलीप सुशिर (वय-४१) रा. पाळधी यांनी शेतातून ८० हजार रूपये किंमतीचे १० ते १२ ‍क्विंटल कापूस चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रमेश दामू सुशिर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.

 

Exit mobile version