Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्याच्या शेतातील तांब्याच्या तारांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने तांब्याच्या तारांची चोरी करून नुकसान केल्याची घटना उघडकीला आली आहे. रविवारी ९ जुलै रोजी दुपारी १ वाजत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शेतकारी राजू संतोष पाटील (वय-३२) वास्तव्याला आहे. त्यांचे शिरसोली शेत शिवारात शेत आहे. या शेतात ठिंबक नळ्या आणि तांब्याची केबल ठेवण्यात आलेल्या होत. शनिवारी ८ जुलै सायंकाळी ७ ते रविवारी ९ जुलै सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात ठेवलेले तांब्याचे केबल वायर चोरून नेले. ही घटना घडल्यानंतर शंतकरी राजू पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रविवारी ९ जुलै रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करीत आहे.

Exit mobile version