Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इमारतीच्या प्लॅटमधून कॉपर वायरच्या बंडलांची चोरी

रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामदास कॉलनी येथील बांधकाम साईटच्या इमारतीच्या प्लॅट मधून २ लाख २ हजार ३२० रूपये किंमतीचे कॉपर वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामदास कॉलनी परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी प्लॅटमध्ये कॉपर वायरचे बंडल ठेवण्यात आले होते. गुरूवार ९ नोव्हेंबर रात्री ८ वाजता ते शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २ हजार ३२० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हाप्रकार इंजिनिअर लोकश किशोरे मोरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Exit mobile version