Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारच्या इन्व्हर्टरसह सायलेंन्सरची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील आयटीआय महाविद्यालयासमोरून कारचे इन्व्हर्टर आणि सायलेन्सर असा एकुण ५० हजार मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज चांगू पाटील (वय-३९) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची कार (एमएच १९ सीव्ही ३९७६) क्रमांकाची कार गावातील आयटीआय महाविद्यालयाजवळ पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्याने कारचे सायलेंन्सर आणि कटेलिटीक कन्व्हर्टर असा एकुण ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी युवराज पाटील यांनी २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहे.

Exit mobile version