Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद शाळेच्या खोलीतून इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या बंद शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून ईन्व्हर्टरसह बॅटरी असा एकुण १२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरून नेल्याची घटना शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, वरणगाव शहरातील जिल्हा परिषदेची शाळा ही ७ नोव्हेंबरपासून दिवाळी निमित्त बंद आहे. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत इन्व्हर्टर आणि बॅटरी असा एकुण १२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवार ११ नोव्हेंबर रेाजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र जैन करीत आहे.

Exit mobile version