Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीविठ्ठल नगरातून ट्रक्टरसह ट्रॉलीची चोरी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घरासमोर लावलेले ट्रक्टरसह ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शहरातील हरीविठ्ठल नगरात उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संदिप सुभाष हटकर (वय-३३) रा. हरीविठ्ठल बस स्टॉप जवळ हे शेती करतात. त्यांच्याकडे शेती कामासाठी ट्रक्टर क्रमांक (एमएच १८ झेड ३४३६) जे आजोबाच्या नावे आहे. त्याची आई आजारी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्या दवाखान्यात होत्या त्यामुळे शेतीचे व ट्रॅक्टरचे काम बंद होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता दवाखान्यातून घरी आले असता त्यांचे १ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ट्रक्टरसह ट्रॉली दिसून आले नाही. त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी आटोपल्यानंतर ट्रक्टरसह ट्रॉलीचा शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासून बघितले मात्र मिळून आले नाही. ट्रक्टर न मिळाल्याने आज रामांनद नगर पोलीस स्टेशन गाठले. संदिप हटकर यांच्या फिर्यादीवरून रामांनद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version