Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टरच्या घरासमोरून कारची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोरून एका डॉक्टरांची स्विप्ट कारची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत सोमवारी १० जुलै रोजी दुपारी १ वाजात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन जवळ डॉ. साजीद दगडू तडवी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे स्विप्ट कार क्रमांक (एमएच १९ सीयू ०२८०) आहे. शनिवार ८ जुलै रोजी रात्री १० वाजता डॉ. तडवी यांनी त्यांची कार त्यांच्या घरासमोर आलेल्या झाडाजवळ पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली कार चोरून नेल्याचे रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. हा प्रकार घडल्यानंतर डॉ. तडवी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर सोमवारी १० जुलै रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Exit mobile version