Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेरी नाका परिसरातून दुचाकीची चोरी; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका परिसरातील दुकानाच्या बाहेर लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २७ मार्च रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी तीन दिवसांनंतर ३० मार्च रोजी शनीपेठ पोलीसात गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जगदीश गिरधारीलाल चव्हाण (वय-४५) रा. तळेले कॉलनी जळगाव, याचे नेरी नाका परिसरातील चपल व बुट विक्रीचे दुकान आहे. २७ मार्च रोजी सकाळी जगदीश चव्हाण हे दुचाकी (एमएच १९ एझेड ५८०८) ने आले. दुचाकी सायंकाळ पर्यंत जागेवर होती. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याचे समोर आले. परिसरात शोधाशोध करून मिळून न आल्याने अखेर तीन दिवसानंतर ३० मार्च रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात जगदीश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश माळी करीत आहे.

 

Exit mobile version