Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅस गोडावून मधून २१ सिलेंडरची चोरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी शिवारातील गोडावूनमधून २१ घरगुती गॅस सिलेंडरची अज्ञात चोरट्यांनी चोरून करून सुमारे ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी शिवारात कृणाल केशव कोळी यांचे शेत आहे. शेतात त्यांच्या मालकीचे गॅसचे गोडावून आहे. २३ जून रोजी दुपारी अडीच ते २५ जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोडावून मधून २१ गॅसचे सिलेंडर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल बोरकर करीत आहे.

 

Exit mobile version