Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी नगराध्यक्षांच्या शेतातील गोदामातून तुरीच्या २१ पोत्यांची चोरी; यावल पोलीसात गुन्हा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील माजी नगराध्यक्ष यांच्या शेतातील गोदामातून तुरीच्या २१ पोत्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांचे वढोदा शिवारात अंकलेश्वर-बऱ्हाणपुर राज्य महामार्गलगत शेत आहे. शेतात त्यांचे शेतातील माल ठेवण्यासाठी गोदाम तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांनी नुकताच काढून ठेवलेले तुरीचे पोते ठेवण्यात आले होत. दरम्यान मंगळवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामातील ६८ हजार २५० रूपये किंमतीची २१ तुरीची पोते चोरून नेले. हा प्रकार बुधवारी १६ मार्च रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

 

 

Exit mobile version