Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुर्‍हे पानाचे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडले

bank atm kurhe

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील बसस्टँड परिसरात असणारे आयडीबीआय बँकेचे एटीएम रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, कुर्‍हे पानाचे येथील बसस्थानक परिसरात असणार्‍या व्यापारी संकुलात आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे हे एटीएम फोडल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातून रक्कम लंपास करण्यात आली असली तरी याचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ही चोरी नेमकी कशी झाली याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी एटीएमच्या आतील भागात गॅसचे सिलेंडर व कटर आढळून आले आहे. यामुळे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान ही चोरी घडल्याची शक्यता आहे.

Exit mobile version