Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या बसमधून ३० हजार लंपास

ganesh rana

जळगाव प्रतिनिधी । धावत्या बसमध्ये शेजारी बसलेल्या महिलांनी एका स्त्रीच्या पर्समधून तीस हजार रूपये लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत माहिती अशी की, लताबाई चंद्रकांत पाटील (रा. कासोदा ता. एरंडोल) या जळगाव येथे राहणार्‍या मुलगा डॉ. किरण पाटील (रा. रायसोनी नगर) यांच्याकडे येण्यासाठी एरंडोल-जळगाव बसमध्ये बसल्या. त्याचवेळी दोन अज्ञात महिला दोन मुलांसह यांच्या बाजूला बळजबरीने बसल्या होत्या. पाळधी ते बांभोरी दरम्यान या दोन्ही महिलांनी लताबाई पाटील यांच्या पर्समधून तीस हजार रुपये रोख व एक ग्रॅम सोन्याच्या बाळ्या चोरून घेतल्या. यानंतर त्या बसमधून उतरून गेल्या. हा प्रकार लताबाई यांना खोटे नगर जवळ आल्यानंतर समजला. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. याबाबत पाळधी पोलिसात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version