Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावातील बाबाजी नगरात चोरी; ४० हजाराचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील जयबाबाजी चौकात राहणारे गुप्ता यांच्या घरातून चोरट्यांने सोन्याच्या अंगठ्या आणि ३० हजार रूपयांची रोकड असा एकुण ४० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, प्रशांत गिरीश गुप्ता (वय-२९, रा. जयबाबाजी चौक चाळीसगाव) हे आईवडिलांसह राहतात. त्यांचे वडील गिरीश विश्वनाथ गुप्ता हे बुलढाणा अर्बन बँकेत कलेक्शनचे काम करतात. दरम्यान काल सोमवारी २६ जुलै रोजी रात्री १० वाजता सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील बेडरूममध्ये कपाट उघडल्याचा आवाज आल्याने त्यांची आई आशा यांना जाग आली. त्यावेळी बेडरूममध्ये आले असता एक अनोळखी २०-२५ वर्षीय वयोगटातील तरुण दिसून आला. आशाबाई गुप्ता यांना पाहून अज्ञात चोरटा घरातून बाहेर पळत धुम ठोकली. यावेळी आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील व शेजारील लोक जागे झाले. त्यांनी घरात येऊन पाहणी केली असता कपाटातील १० हजाराची ४ ग्रॅमची अंगठी आणि ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. या संदर्भात प्रशांत गुप्ता यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

 

 

 

Exit mobile version