Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतील साईबाबा मंदिरासमोरून तरुणाची दुचाकी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवार २४ मे रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल मुरलीधर चौधरी (वय-३९) रा. गणेश कॉलनी रोड, साईबाबा मंदिरासमोर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २० मे रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांनी दुचाकी (एमएच १९ सीएच १९०८) पार्किंग करून लावली होती. दरम्यान त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार २४ मे रोजी रात्री ८ वाजता उघडकीला आला. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा शोधाशोध केली, परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही, अखेर मंगळवारी २४ मे रोजी दुपारी अमोल चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रतिभा पाटील करीत आहे.

 

Exit mobile version