Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजिंठा चौकातून तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळ तरूणाच्या खिश्यातून १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गोपाल कैलास देशमुख (वय-२१) रा. हिवरी दिगर ता. जामनेर जळगाव हे कामाच्या निमित्ताने ९ सप्टेंबर रोजी जळगावात आले होते. दरम्यान सांयकाळी काम आटोपून ते घरी जाण्यासाठी अजिंठा चौकात आले. त्यावेळी रस्त्यावर उभे होते. उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे सायंकाळी ७.१५ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी गोपाल देशमुख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Exit mobile version