Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणी मार्केटमधून तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आलाय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रोहन भानुदास पाटील (वय-३५) रा. दांडेकर नगर, पिंप्राळा हा तरूण ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान , कामाच्या निमित्ताने शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील दुकान नं. २७८ येथे मोबाईलच्या कामासाठी आला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याच्या खिश्यात असलेला १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. तरूणाने परिसरात मोबाईलची शोधाशोध केली परंतू आढळून आला नाही. आठ दिवसानंतर शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता शहर पोलीसात मोबाईल चोरी झाल्याबद्दल तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे  करीत आहे.

 

Exit mobile version