Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शास्त्री मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शास्त्री मार्केट परिसरातून तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास  उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी शहर पोलीसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजय अरूण बाविस्करी वय ४० रा. चंदनवाडी पेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खागसी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संजय बाविस्कर हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच १९ सीडी २५९९ ने जळगाव शहरातील काशिनाथ शास्त्री मार्केट येथे आले. त्यावेळी त्यांनी मार्केटच्या बाजूला दुचाकी पार्क करून लावली होती. काम आटोपून संजय बाविस्कर हे दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्यानंतर दुचाकीचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

Exit mobile version