Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकी येथे दुचाकी अपघातात तरूण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातून काम आटोपून तालुक्यातील खडकी बुद्रुक मार्गे घरी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीचा अपघात झाला. यात तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.  

सागर रामसिंग पवार (वय-२५) रा. चत्रभुज तांडा शिंदी ता. चाळीसगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. 

याबाबत वृत्त असे की,  सागर पवार हा तरूण खासगी कामानिमित्त मित्रांसमवेत चाळीसगाव शहरात आला होता. दरम्यान काम आटोपल्यानंतर आपल्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीने (क्र. एम.एच.१९ बी.टी. ५२४८) चाळीसगावहून घरी निघाला.  सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील पुलाजवळ झालेल्या अपघात झाला त्यात सागर पवार याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून पंचनामा करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील व भट्टू पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version