Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गाडी बाजूला लावण्यावरून तरूणावर पट्टीने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऊस रसवंतीची गाडी बाजूला करण्याचे सांगितले असता त्याचा राग आल्याने त्याने तरुणावर पट्टीने वार केल्याची घटना कमल पॅराडाईज या हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी विक्रेत्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील विठोबा नगर येथे विलास मुरलीधर कोळी वय ४० हे राहतात.  त्याच्या रसवंतीचा व्यवसाय असून तो हॉटेल कमल पॅराडाईज परिसरात गाडी लावून त्यावर उदरनिर्वाह भगवतो. याच परिसरात जैनाबाद येथील भरत विलास कोळी हासुद्धा रसवंती ची गाडी लावतो. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विलास कोळि याने भरत कोळी याला त्याची गाडी बाजूला करण्यास सांगितले. त्याचा राग आला नाही भरत कोळी याने विलास कोळी यांच्यावर पट्टीने वार करत दुखापत केली. याप्रकरणी विलास कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भरत विलास कोळी याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहेत

Exit mobile version