Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्वस्त्र करून तरुणीला जमावाकडून अंघोळ

crime-2

सीकर ( राजस्थान) वृत्तसंस्था । सीकर जिल्ह्यात खाप पंचायतीच्या आदेशानंतर नेछवा ग्रामपंचायत मधील सोला गावात एका तरूण-तरुणीला अपमानास्पद वागणूक दिली आहे. या तरूण-तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खाप पंचायतीने ४०० लोकांसमोर आंघोळ घालण्याचा आदेश दिला.

शुद्धिकरण करण्याच्या नावाखाली पंचांनी हा आदेश दिला. पीडित कुटुंबीयांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार देण्यात आला. तरुणीला निर्वस्त्र करून आंघोळ घालण्यात आली.

अनेकांनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मात्र, कुणीही या अमानवीय घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. , २१ ऑगस्टला ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती.

अखिल राजस्थान सांसी समाज सुधार आणि विकास न्यासाचे प्रदेश अध्यक्ष सवाईसिंह मालावत यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोविड १९ अंतर्गत नियमांचे उल्लंघन आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

शिक्षा सुनावणाऱ्या खाप पंचायतीच्या पंचांनी दोघांच्याही कुटुंबीयांना दंड ठोठावला आहे. त्यानुसार तरुणाकडून ३१ हजार रुपये आणि तरुणीच्या कुटुंबीयांकडून २२ हजार रुपये वसूल करण्यात आले.

Exit mobile version