Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवेकानंद परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद नगर परिसरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, अक्षय गजानन कांबळे (वय-२४) रा. विवेकानंद नगर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतात. ६ नोव्हेंबर रात्री ८ वाजेपासून ते ७ नोव्हेंबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ सीई ५५८०) ही घराच्या समोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे दुचाकी चोरून नेले. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर अक्षय कांबळे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र दुचाकी कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे अखेर गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी करीत आहे.

Exit mobile version