Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या दुकानाजवळ पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार ८ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी १२ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर शिवदास शिरसाठ वय-५५ रा. शामराव नगर, आशा बाबा नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता तो नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकी क्रमांक एमएच 19 बीएफ 3241 ने आलेला होता. त्यावेळी त्यांने दुचाकी महाविद्यालयाच्या गेटसमोर पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवारी १२ मे रोजी दुपारी २ वाजता पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.

Exit mobile version