Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसस्थानक आवारातून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावातील बसस्थानक आवारातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी बुधवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील मांडवा दिगर येथील रहिवाशी भिवसन शिवा वाघ (वय-२६) हा तरूण वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भिवसन वाघ हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीआर ६७०३) ने भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावातील बसस्थानक आवारात आलेला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भिवसन वाघ याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

Exit mobile version