Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामीण रूग्णालयात तरूणाची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रूग्णालयातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजू तुफानसिंग आर्या (वय-२४) रा. पिंपळे रोड, धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संजू आर्या हा मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता धरणगाव ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने आलेला होता. त्याने दुचाकी ग्रामीण रूग्णालयाच्या पार्कींग झोनमध्ये दुचाकी पार्क करून लावून नातेवाईकांना भेटण्यासाठी निघून गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. संजू आर्या हा नातेवाईकांना भेटून पुन्हा दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

Exit mobile version