Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिव्हील हॉस्पिटलसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

 जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशाद्वारासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता उघडकीला आली आहे. याबाबत गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जाफर शेख अन्वर (वय-३२) रा. पिंप्राळा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २८ सप्टेबर रोजी सायंकाळच्या सुमारास जाफर शेख अन्वर हा त्याची (एमएच १९ बीए ७६१२) क्रमांकाची दुचाकीने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्कींगला लावून नातेवाईकांना भेटण्यासाठी निघून गेला. सायंकाळी साडेसात वाजता काम आटोपून पतर जाफर अन्वर हा घरी जाण्यासाठी पुन्हा दुचाकीजवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळाली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे करीत आहे.

Exit mobile version