Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लढ्ढा फार्मा समोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |   जळगाव शहरातील लढ्ढा फार्मा समोरून एका तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले . याबाबत बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शोएब रफिक पिंजारी (वय-२२) रा. मास्टर कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तो लड्डा फार्मच्या समोरील शेखर आटो येथे दुचाकी (एमएच १९ सीएम ४०७१) ने आलेला होता. त्यावेळी त्यांनी त्याच ठिकाणी दुचाकी पार्किंग लावली. दरम्यान पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शोएब पिंजारी आणि त्याचा दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून आले नाही. त्यामुळे अखेर त्याने बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करीत आहे.

Exit mobile version