Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरसमोर लावलेली तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॅप्पल होम कॉलनीतील नवजीवन सुपर शॉपजवळ एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभय कौतिक पाटील वय-२७, रा. हॅपी होम कॉलनी, जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. तरुणाने त्याची दुचाकी एम एच 19 डीजी 850 हॅपी होम कॉलनीतील नवजीवन सुपर शॉप येथे शुक्रवारी १९एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. दरम्यान याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

Exit mobile version