Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उसनवारीचे पैसे मागितल्याच्या रागातून तरूणाला दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील रामेश्वर कॉलनीत उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरूण तरूणाला दोन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधीक असे की,  सागर सुरेश कोळी (वय-३२, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाला दोन जणांनी मारहाण केली. सागर कोळी याने रामे‌श्वर कॉलनीतील एका जणाला पैसे उधार दिले होते. ते त्याने परत मागितले असता समोरील २९ नोव्हेंबर रेाजी रात्री ८ वाजता योगेश उर्फ कर्कटक भागवत जाधव व त्याच्या मित्राने सागरला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याला दुखापत झाली. या प्रकरणी सागर कोळी याने शुक्रवारी १ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दयानंद सरवदे करीत आहेत.

Exit mobile version