Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तणावातून तरूणाने मृत्यूला कवटाळले

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ४१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याने तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यावेळी नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रूग्णालयात एकच अक्रोश केल्याचे पहायला मिळाले.  किशोर जैन रा. रथगल्ली रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, किशोर जैन हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता.  राहत्या घरात कुणीही नसतांना त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तो कोणत्यातरी तणावात होता. याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version