Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूण जागीच ठार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचव्या मजल्यावरून पडल्याने २९ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, औदुंबर रविंद्र पाटील (वय-२९) रा. मेहरूण जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहत होता. सोमवारी २ मे रोजी दुपारी वाजेच्या मेहरूण परिसरातील एका पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरूण पाचव्या मजल्यावर कश्यासाठी गेला. तो चुकन पडला किंवा आत्महत्या केली यांची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. इमारतीकडून जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांच्या हा प्रकार दिसून आल्याने घटना उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रतिलाल पाटील हे करीत आहे.

Exit mobile version