Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारहाण केल्याच्या नैराश्येतून तरूणानं केलं अस काही.. नातेवाईकांचा अक्रोश !

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तरूणाला मारहाण केली होती. त्यामुळे मारहाण केल्याच्या नैराश्येतून तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुषण लक्ष्मण कोळी वय २० रा. भोलाणे ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे भूषण कोळी हा तरूण आपल्या आईवडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी भोलाणे गावात लग्न होते. या लग्नाच्या कार्यक्रमात रात्री २ वाजता भूषण कोळी याचा गावातील काही तरूणांसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्याला गावातील स्वप्‍नील गोकुळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा उर्फ अरूण कोळी आणि किरण गणेश कोळी या चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने मारहाण केल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. अशी माहिती मयत भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी पत्रकारांनी दिली. भूषणने गळफास घेतल्याचे सकाळी ८ वाजता उघडकीला आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली.

Exit mobile version