Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूण शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय गावातून एका तरूण शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेल्याची घटना मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुर्गेश संजय पेठकर (वय-२८) रा. बेलव्हाय ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची मालकीची दुचाकी (एमएच १९ एवाय ५१४) हे गावातील हेमंत जंगले यांच्या घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुर्गेश पेठकर याने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ यूनूस मुसा शेख करीत आहे.

Exit mobile version