यावल शहरातील जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे; शिवसेनेची तक्रार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे (पाईपलाईन) काम अत्यंत बोगस व निकृष्ट प्रतिचे झाले असून शिवसेना शहर शाखेच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात यावल शहर शिवसेनाच्या वतीने यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदना म्हटले आहे की , यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील नविन विस्तारीत वसाहतीमध्ये सुमारे एक वर्षा पुर्वी नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा या हेतु सुमारे दोन कोटी रूपये खर्चातुन जलकुंभ व विस्तारीत भागातील विविध कॉलनी मध्ये जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्यात आली असुन सदरच्या पाईपलाईनचे काम संबधीत ठेकेदाराने कुठल्याही प्रकारचे तांत्रीक पध्दतीचे मार्गावरील चढउतारचा अंदाज व लेव्हलींग न करता नविन डांबरीकरणाचा रस्ता खोदून पाईपलाईन टाकुन त्या ठीकाणी खड्डे मात्र सोडुन दिले. या खोदलेल्या रस्त्यावर हायड्रोलीक पध्दीने पुर्ण पाईपलाईनचे टेस्टटींग न करणे, जीपीएस पद्धतीने अगोदर फोटो घेवुन काम करणे यासह अनेक त्रुटया या कामांमध्ये राहुन गेल्याने या जलवाहीनीतुन नागरीकांना अनियमित व पिण्यास मुबलक पाणी मिळत नसल्याने प्रचंड हाल होत आहे .

या सर्व गोंधळलेल्या निकृष्ठ कामांमुळे नागरीकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागेल या हेतुने राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या या जलकुंभ व पाईपलाईनच्या अत्यंत निकृष्ठ कामामुळे शासनाचा हा संपुर्ण निधी पाण्यात गेला की काय अशी भावना नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे.

तरी यावल नगर परिषदने या संपूर्ण कामाची तात्काळ निष्पक्ष:चौकशी करून संबधीत ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी, तसे न झाल्यास यावल शहर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे मुख्याधिकारी मनोज म्हके यांना दिलेल्या तक्रार  निवेदनात म्हटले असुन या निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष धोबी, यावल तालुका उपप्रमुख शरद कोळी, तालुका संघटक पप्पु जोशी यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

Protected Content