Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुवार्डी तलावाचे काम आ. किशोर पाटील यांच्यामुळे लागले मार्गी (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 05 06 at 7.32.46 PM

WhatsApp Image 2019 05 06 at 7.32.46 PM

जळगाव (प्रतिनिधी) आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा केली.

 

आमदार किशोर पाटील यांनी भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील १९८६ पासून प्रलंबित असलेला तलावाचा विषय मार्गी लावला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली. जुवार्डी येथे नं. ३ याचे ८१ लाख ३८ हजार रुपये हे वन विभागाकडे भरायचे होते. परंतु, आता पर्यंत ते पैसे न भरल्या गेल्यामुळे जवळपास ९० टक्के झालेले काम अपूर्ण अवस्थेत होत. याचा आ. पाटील यांनी पाठपुरावा करून ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्याचे ८१ लाख ३८ रुपये जिल्हा अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. आगामी २ दिवसात तो पैसा वन विभागाकडे वर्ग केल्या नंतर आचार संहिता संपल्या बरोबर वर्क ऑडर किंवा इस्टिमेट तयार होऊन प्रत्यक्ष कमला सुरुवात होईल अशी माहिती आ. पाटील यांनी दिली. याचा लाभ पाण्यापासून वंचित गावांना नक्कीच होणार असून भविष्यात या गावांना पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही असे चांगले काम झाले आहे याचा मला आनंद असल्याचे मत आ. पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड सोबत व्यक्त केले. दरम्यान, आ. पाटील यांनी पाणी टंचाईच्या उपाययोजना संदर्भात देखील चर्चा केली.
 

 

Exit mobile version