Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत विकास परिषदेचे कार्य कौतुकास्पद – खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी । कोणी नाही तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खा. उन्मेष पाटील यांनी आज काढले.

भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे महेश प्रगती मंडळ सभागृहात आयोजित रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद राष्ट्रीय वित्‍त सचिव संपत खुरदिया, राष्ट्रीय सचिव पश्‍चिम क्षेत्र सुधिर पाठक, देवगिरी प्रातांध्यक्ष गोपाल होलाणी, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, जिल्हा जळगाव जि. रा.स्व. सघचालक डॉ. निलेश पाटील, के.के.कँन्सचे अध्यक्ष उद्योजक रजनीकांत कोठारी, भारत विकास परिषद जळगाव शाखाध्यक्ष उज्वल चौधरी, सेटलर तुषार तोतला इ. मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. अध्यक्ष उज्ज्वल चौधरी यांनी भारत विकास परिषद कार्य विशद केले तर तुषार तोतला यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम उद्देश विशद केला. मान्यवरांच्या हस्ते कोविड काळात सेवा देणारे डॉ. पराग चौधरी, डॉ. राहुल महाजन, डॉ. परिक्षित बावीस्कर, डॉ. विलास भोळे, डॉ. पल्लवी राणे यांचेसह 24 डॉक्टर्स चा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच बरोबर भोजन व्यवस्था करणारे अतुल तोतला, अतुल राका या परीवाराचा तसेच अंतिम संस्कार करणाऱ्या विकास वाघ, मुकेश पाटील या यौध्या सोबत संपर्क फाऊंडेशन चे कर्मचारी वर्गाला मानचिन्ह देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.  संपर्क फॉउंडेशन ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी नोंदणीकृत संस्था असून ३०/३५ सेवाव्रती रोज रूग्णांचे जिवन सुसह्य करीत आहे.

याचबरोबर जळगाव शहरातील अनेक डॉक्टर आणि कोविड काळातील विलगीकरण केंद्र व कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्‍या संपर्क फॉउंडेशनच्या सेवाव्रतींचा सन्मान भारत विकास परिषदेने केल्याने आभार मनोगतात व्यक्त केले. डॉ. कल्पेश गांधी, अभिषेक अग्रवाल, आनंद पलोड, सागर येवले यांनी कोविड अनूभव विषद केले. या वेळी रुग्णपयोगी साहित्याचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी तर आभार डॉ. सुरेश अग्रवाल यांनी मानले. यशस्वी साठी भारत विकास जळगाव शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version