Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भक्तीमय वातावरणात पार पडली महिला पायी वारी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील दादासाहेब जी एम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिराची महिला पायी वारी संतनगरी शेगाव येथून भक्तीमय वातावरणात परतली.

अमळनेर ते शेगांव महिला पायी वारी मागील आठवड्यात भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाली होती. या पाश्वभूमीवर महीला पायी वारीचा येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये भजनाचा, सत्कार व महाप्रसादाने सांगता झाली.

पायी वारीला सहकार्य करणार्‍या भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा आर बी पवार व महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार, अविनाश सोनार व सौ. नीताताई सोनार यांनी केला. डॉ जिजाबराव पाटील, नितीन भावे, चेतन उपासनी, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चेतन पाटील ग्रामसेवक,प्राचार्य राजश्री नेरकर मुंबई यांनी महाप्रसाद वाटप केला.

सरला चव्हाण, पूजा पाटील , छाया पवार ,कल्पना पाटील ,वंदना पाटील, आशा पाटील, मंगला पाटील, नितल पाटील, रेवा पाटील, शारदा निकम ,उर्मिला जगताप ,शोभा चौधरी, सुरेखा चौधरी, रेखा बाविस्कर, कल्याणी भावे यांचा सत्कार करण्यात आला. पायी वारीला सहकार्य मोहीत पवार,विलास पाटील, संजय पाटील, भैय्या साळुंखे ,अनिल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, विकास महाजन, जयेश पाटील, श्रीकृष्ण चव्हाण, यांनी केले.

महिला परिवार प्रमुख सौ ज्योतीताई पवार व गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांचा सत्कार बिल्डर अविनाशभाऊ सोनार व सौ. नीताताई सोनार,पत्रकार ईश्वर महाजन, प्रा.हिरालाल पाटील यांनी सत्कार केला. यावेळी सर्व महिला पायीवारीतील भगिनी व गजानन परीवारातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version