Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू वाहतूकदारांकडून महसूल विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरात वाळू वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करीत असलेल्या महसूल विभागाच्या महिला पथकाशी वाद घालून दमदाटी केली व वाळूचे ट्रॅक्टर पळून जाण्यात तिघांनी मदत केल्याचा प्रकार  शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर व परिसरातील अवैध वाळू रोखण्यासाठी  प्रांताधिकारी व तहसीलदारांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार  मंडळाधिकारी सारिका दुरगुडे,  छाया कोळी, तलाठी मृणाली सोनवणे, आदिती जाधव, राजकन्या घायवट, प्रज्ञाराणी वंजारे, अनिता झाल्टे यांचे भरारी पथकाला शुक्रवारी पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी दुपारी १२ वाजता  कानळदा रोडवरील केसी पार्क येथे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळून आली. पथकाने त्यासमोर दुचाकी लावून ट्रॅक्टर चालकास रोखले. त्याची चौकशी करीत असताना चालकाचे साथीदार प्रमोद उर्फ भैय्या भिकन सपकाळे रा. कुवरखेडा ता.जि.जळगाव, निलेश वाणी रा. जुने जळगाव हे तेथे आहे. त्यांनी  शाब्दीक वाद घालून दमदाटी करून पथकाच्या दुचाकी ट्रॅक्टर समोरुन बाजुला केल्या. तसेच तलाठी मृणाली सोनवणे यांची दुचाकी धक्का देवून बाजुला करीत ट्रॅक्टर चालकाला पळून जाण्यास मदत केली. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे  तलाठी मृणाली सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Exit mobile version